Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पाकिस्तानच्या मंत्र्यांचे हास्यास्पद वक्तव्य : “हबल स्पेस टेलिस्कोप’ ला नासा(NASA) ऐवजी पाकिस्तानने अंतराळात पाठवलं”

पाकिस्तानच्या मंत्र्यांचे हास्यास्पद वक्तव्य : “हबल स्पेस टेलिस्कोप’ ला नासा(NASA) ऐवजी पाकिस्तानने अंतराळात पाठवलं”

हल्लीच एक विडिओ वायरल झाला होता, ज्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बोलत आहेत की जर्मनी आणि जपान च्या सीमा एकमेकांना लागून आहेत. हा विडिओ सोशल मीडिया वर आल्यावर इम्रान खानची यथेच्छ थट्टा करण्यात आली. आणि अशी थट्टा करण्यात त्यांचेच नागरिक पुढे होते. याच दरम्यान पाकिस्तानचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री फवाद चौधरींनी एक अस वक्तव्य केलं, ज्यामुळे त्यांना ट्विटर वर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे. त्यांनी बोलताना असा दावा केला की ‘हबल स्पेस टेलिस्कोप’ ला नासा(NASA) ऐवजी पाकिस्तानच्या एयरोनॉटिक्स आणि अंतराळ संशोधन संस्था'(Suparco) ने अंतराळात पाठवलं होतं.

चौधरी हे काल रविवारी ‘जियो’ न्युज च्या ‘नया पाकिस्तान’ या कार्यक्रमात म्हणाले की, “जगातली सर्वात मोठी दुर्बिण… SUPARCO द्वारे पाठवण्यात आली होती. या वक्तव्यानंतर ते ट्रोलर्सच्या रडारावर आले.

यावर एका ट्विटराईट ने ट्विट केलं की, “नासा(NASA) च्या प्रमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन फवाद चौधरी आपल्या मंत्रालया अंतर्गत एयरोनॉटिक्स आणि अंतराळ संशोधन संस्था’ च्या प्रमुखपदी बसू शकतात.” एका ट्रोलर ने तर चक्क विचारलं की,”पाकिस्तान मध्ये स्पेस एजन्सी खरंच आहे का? आणि आहे तर ती कधीपासून?

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *