Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नायर रुग्णालयातील औषधालयाचा संशयास्पद कारभार

नायर रुग्णालयातील औषधालयाचा संशयास्पद कारभार

मुंबई: मुंबईतील ‘ई’ प्रभागातील नायर रुग्णालयाच्या आवारातील औषधांच्या दुकानात जर तुम्ही गेलात आणि त्याठीकाणी डॉक्टर ने दिलेलं प्रिस्क्रिप्शन तिथल्या काउंटरवर दाखवलंत तर तुम्हाला पुढील विचित्र अनुभव येईल.

“साहेब मल्टीव्हिटॅमिनची ‘abc’ कंपनीची गोळी संपलीय, तुम्हाला ‘cba’ कंपनीची गोळी देऊ का? तेवढीच पॉवर आहे त्यात.” हे असे संवाद सर्रास नायर हॉस्पिटलच्या मेडिकल कॉउंटरवर ऐकायला मिळतात. या ठिकाणी प्रश्न असा पडतो कि जर डॉक्टर कोणत्याही आजारावर कोणा रुग्णाला औषध देतो तेव्हा ते नक्कीच चांगल्या कंपनीचे, त्या रुग्णाला लवकरात लवकर आजारमुक्त करणारे असावे. मग अचानक हे औषध दुकानदार स्वतःच्या मर्जीने ज्या कंपन्यांचे नाव कधी कानावर पडलेले नाही अशा कंपन्यांची औषधं का म्हणून ग्राहकाला देतात. बरं हे कधीतरी घडत असेल तर मान्य पण हे असे १० पैकी ९ वेळेला घडत असेल तर हा नक्कीच योगायोग नाही. रक्तदाब, हृदयरोगा वरची औषधं, कॅल्शिअम, मल्टीव्हिटॅमिन वरच्या गोळ्या तर हमखास संशयास्पद अशा जेनेरिक ब्रँड च्या मिळतात. तुम्हाला वाटेल कि काय फरक पडतो? औषध तर एकाच फार्म्युल्यावर बनवलंय. परिणाम सारखाच असेल. पण वास्तवात तसे नाहीये. जेनेरिक औषधांचे उत्पादन करणाऱ्या अनेक चांगल्या तसेच वाईट कंपन्याही आहेत. या साऱ्यांची रसमिसळ येथे झालेली पाहायला मिळते.

पालिका प्रशासनाने या प्रकरणी हॉस्पिटलच्या आवारातील औषध दुकानांच्या वेळोवेळी तपासण्या करणे अपेक्षित असताना तसे प्रत्यक्षात घडताना दिसत नाही. नायर इस्पितळातील ‘द नॅशनल कॅस्युमर को-ओप सोसायटी लिमिटेड’ संचलित औषधालय काही कारणांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी प्रशासकांकडून चालण्यात येत असल्याचे कळते. त्यामुळे येथे काही गैरव्यवहार तर होत नाही ना अशी शंकाही येते. सुदैवाने मुंबईतील ‘के.ई.एम.’ इस्पितळाच्या औषधालयाची परिस्थिती फार चांगली म्हणावी. किमान येथे हवी असलेली त्याच ब्रँडची औषधं उपलब्ध असतात तीही योग्य दरात. पण हे सुखावह चित्र फक्त महाराष्ट्रातल्या काही ठराविक रुग्णालायात पाहावयाला मिळते बाकी सगळीकडे बजबजपुरीच माजलेली दिसतेय. मुंबई महानगरपालिका, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या प्रकरणी लक्ष घालवे असे टीम महाराष्ट्र वार्ता आवाहन करते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *