नागपूर महानगरपालिकेद्वारे आशीनगर झोन सुजाता नगर येथे स्वच्छता रॅलीचे आयोजन
नागपूर, दि. २०: नागपूर महानगरपालिकेद्वारे आशीनगर झोन सुजाता नगर येथे स्वच्छता रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये नागरिकांना “स्वच्छता बाळगा, रोग दूर करा” मोहिमेचा संदेश देण्यात आला. वैयक्तिक स्तरावर श्रमदान करणे, प्लास्टिकमुक्त शहर, कंपोस्ट, रेड अँड यलो स्पॉट फ्री सिटी अशा विशेष मोहिमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महानगरपालिकेतर्फे करण्यात आले.
यासोबतच स्वावलंबी नगर मधील नागरिकांना देखील कचरा वर्गीकरण विषयी जागरूक करण्यात आले.या स्वच्छता रॅलीत विभागीय अधिकारी सुनील तांबे व विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
