दहशतवाद विरोधी पथकाकडून साकिब नाचणसह एकूण १२ संशयितांना अटक
ठाणे/भिवंडी, दि. ०२: दहशतवादाशी संबंधित एका प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यात छापेमारी करून १२ संशयितांना अटक केली. दहशतवाद विरोधी पथकाने साकिब नाचण, अकिब साकिब नाचण, अब्दुल लतीफ कासकर, कैफ नाचण, शाजील नाचण, फारक झुबेर मुल्ला यांच्यासह प्रतिबंधित संघटना सिम्मीच्या काही माजी पदाधिकाऱ्यांच्या घरांची आणि परिसराची झडती घेतली. झडती दरम्यान ६ जण त्यांच्या घरात आढळले नाहीत. ए टी एस ने पुढील तपासासाठी १२ जणांना अटक केलं आहे.
Source – AIR
