एनटीपीसी इलेक्ट्रॉन प्रश्नमंजूषा २०२५ स्पर्धेत मुंबई प्रादेशिक फेरीत आयआयटी मुंबईच्या गटाला प्रथम पारितोषिक
मुंबई, दि. २७: एनटीपीसी इलेक्ट्रॉन प्रश्नमंजूषा स्पर्धा – २०२५- मुंबईतील प्रादेशिक फेरीत आयआयटी मुंबईच्या प्रयाग मोहन्ती आणि केशवराम एस.या विद्यार्थ्यांनी ६०,००० रुपयांचे पहिले बक्षीस मिळवले. गुरुवारी (२७ नोव्हेंबर) एनटीपीसी म्हणजेच राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्र पश्चिम क्षेत्र-१ मुख्यालयाच्या वतीने भारतरत्नम – मेगा सीएफसी, अंधेरी पूर्व येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, केरळ आणि गोवा येथील प्रमुख अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे २४ संघ उत्साहाने सहभाग झाले.
,CEO(NGEL)andRHOHR(West-I)N3JA.jpg)
“व्यवसाय आणि व्यवस्थापनाच्या जगातील “एनीथिंग आणि एव्हरीथिंग ” या संकल्पनेवर आधारीत या स्पर्धेच्या प्रादेशिक फेरीचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना नेतृत्व, बाजारपेठ, व्यवस्थापकीय धोरण, उद्योजकता, नवोन्मेष आणि शाश्वत धोरणे यामधील समकालीन संकल्पनांशी परिचित करून देणे हा आहे.
स्पर्धेची सुरुवात; तत्काळ उत्तरे द्या (ऑन-स्पॉट) या लेखी फेरीने झाली,ज्यामध्ये सर्व सहभागी संघांनी संकल्पनेशी निगडित- प्रश्नावली सोडवली. दृक्श्राव्य फेरी(ऑडिओ-व्हिज्युअल सेगमेंट), त्वरित उत्तर द्या (रॅपिड-फायर राउंड) आणि बझर फॉरमॅट्ससह मल्टीमीडिया ऑन-स्टेज फायनलमध्ये प्रथम विजयी झालेल्या सहा संघांनी प्रवेश केला.
या कार्यक्रमाला प्रादेशिक कार्यकारी संचालक (पश्चिम-I) ई. सत्य फणी कुमार, यांच्यासह अनेक वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते, ज्यातील काही जण नवी दिल्लीहून दृक्श्राव्य पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
आपल्या संदेशात ते म्हणाले, ” व्यवसाय आणि नवोपक्रमांचे भविष्य सक्षम हातात आहे,हे या तरुण मनांचा उत्साह दर्शवितो. बुद्धिमत्ता, नेतृत्व आणि निरोगी स्पर्धेची भावना जोपासणारे व्यासपीठ प्रदान करण्यासाठी एनटीपीसी वचनबद्ध आहे.” या प्रादेशिक फेरीचे आयोजन आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातनाम जाणकार व्यावसायिक आणि ग्रे सेल्सचे संस्थापक, आणि सुप्रसिद्ध प्रश्नमंजूषा आयोजक (क्विझ मास्टर) गौतम बोस यांनी केले.
चुरशीच्या अंतिम फेरीत,आयआयटी मुंबईच्या प्रयाग मोहन्ती आणि केशवराम एस.या विद्यार्थ्यांनी ६०,००० रुपयांचे पहिले बक्षीस मिळवले. तर, आयआयएम नागपूर येथील प्रांजल पराशर आणि प्रथमेश तन्ना यांनी ४०,००० रुपयांचे दुसरे बक्षीस मिळवले. बिट्स पिलानी के. के. बिर्ला गोवा कॅम्पसमधील ध्रुव चांडक आणि लक्ष्मी शेवानी यांनी २०,००० रुपयांचे बक्षीस मिळवून तिसरे स्थान पटकावले. तनिष्क सक्सेना आणि कार्तिक पाठक (आयआयटी मुंबई), पूर्वेश तडस आणि मोहित मुरगावकर (आयआयएम मुंबई), आणि सुमित घोडे आणि ध्रुव रावत (IIM मुंबई) यांच्या तीन संघांना प्रत्येकी ₹८,००० ची उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.

JBAQ.jpg)
प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे विजेते १८ आणि १९ डिसेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय औष्णिक विद्युत केंद्राच्या(एनटीपीसी) पॉवर मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (पीएमआय) नोएडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील उपांत्य फेरी आणि समारोपाच्या अंतिम फेरीत एनटीपीसी पश्चिम विभाग-१ यांचे प्रतिनिधित्व करतील.

