Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

नवलंच! मुंबईत महिला दिनानिमित्त ‘यांनी’ दिली चक्क मोफत ब्युटी पार्लर सेवा !

भाजप महिला आघाडीच्या श्रुती घोगळे व आधुनिक स्त्री विकास प्रतिष्ठान आयोजित अनोखा महिला दिन सोहळा

मुंबई, दि.९: काल जागतिक महिला दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. या निमित्ताने राज्यभर अनेक सामाजिक संस्था, विविध राजकीय पक्षांच्या महिला आघाड्या व महिला कार्यकर्त्यांनी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. मुंबईतही सामाजिक कार्यकर्त्या श्रुती घोगळे(Shruti Ghogale) व आधुनिक स्त्री विकास प्रतिष्ठान यांनी जरा हटके उपक्रम राबवत जागतिक महिला दिन साजरा केला.

मुंबईतील विक्रोळी (पूर्व) स्थित ‘व्ही मॅट’ सलून(VMAT Saloon) येथे परिसरातील महिलांसाठी एका दिवसिय मोफत ब्युटीपार्लर सेवा देण्याचा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फेशिअल, हेअर कटिंग, मसाज, आयब्रो व इतर अनेक सेवांचा महिलांनी लाभ घेतला. आता महिला म्हंटल्यावर आपल्या सौंदर्याप्रति विशेष काळजी घेणारंच. नेमकं हेच हेरून श्रुती घोगळे यांनी व आधुनिक स्त्री विकास प्रतिष्ठानच्या विद्या सरमळकर(Vidya Sarmalkar) यांनी महिलांना जागतिक महिला दिनी हे सरप्राईज गिफ्ट दिलं.

या कार्यक्रमाला महिलांची लक्षणीय उपस्थिती राहिली. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अपर्णा प्रभू, सामाजिक कार्यकर्त्या प्रेमवती सरमळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा चव्हाण यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. श्रद्धा नारायणकर, ऍड. जयश्री बोडके, ऍड. गायत्री प्रधान व्यावसायिका उज्वला, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या सुपरवायझर नंदीका काळभोर, उपाध्याय शाळेच्या कांचन सिंह आणि करिष्मा गुप्ता यांच्या सारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

या कार्यक्रमात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप विक्रोळी विधानसभा महिला मोर्चा च्या अध्यक्ष रजनी कदम व पल्लवी पाटील यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस हवालदार संगीता आणि स्वाती यांना सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गीता नाईक, पूजा कांबळे, संगीता मर्गज व राजश्री साटम यांनी विशेष परिश्रम घेतले. या वर्षी लाभलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामूळे पुढच्या वर्षीही मोफत ब्युटी पार्लर सेवेसारखा उपक्रम आम्ही नक्की राबवू असे श्रुती घोगळे महाराष्ट्र वार्ता शी बोलताना म्हणाल्या.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *