Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

रात्र पाळीनंतर पावसाची दिवसपाळीही जोरात; मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा अजूनही बाधित

रात्र पाळीनंतर पावसाची दिवसपाळीही जोरात; मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा अजूनही बाधित

मुंबई: गेले तीन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने आजही आठवड्याच्या सुरुवातीला दमदार ओपनिंग करत मुंबई व कोंकण किनारपट्टीला चिंब केले आहे. या सर्वाचा परीणाम उपनगरीय रेल्वे सेवांवर झाला आहे. मध्य रेल्वे, हार्बर व पश्चिम रेल्वे या तीनही मार्गांवर याचा प्रभाव जाणवत आहे. परिणामी लोकल वाहतूक मंदावली आहे. काही ठिकाणी रेल्वे ट्रॅक वर पाणी साचल्यामुळे रेल्वे १०-१५ मिनीटे उशिराने धावत आहे.

मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरात काल रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसाने विश्रांती न घेता सकाळीही पहिल्या शिफ्ट ला हजेरी लावली आहे. यामुळे मुंबईतील सखल भागात विशेषतः हिंदमाता, किंग्ज सर्कल, परळ तसेच अंधेरीतील काही भागात पाणी साचलं आहे. सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची यामुळे ससेहोलपट झाली. शाळकरी मुलांनीही पाण्यात एकमेकांचे हात हातात धरून कशीबशी शाळा गाठली. नवी मुंबईतील वाशी, बेलापूर, नेरुळ, खारघर व पनवेल विभागातही दमदार पाऊस पडत असून काही सखल भागात पाणी साचले आहे. प्रशासनाने गरज असेल तरच बाहेर पडण्याचे नागरिकांना आवाहन आहे.

Photo Credit : (Twitter)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *