मुंबई, नवी मुंबई परिसरात पावसाची धुवांधार बॅटिंग
मुंबई: मुंबई आणि परिसरात सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालेला पाऊस आपली इनिंग बराच वेळ लांबवत आहे. रात्रीपासून पाऊस सुरू झालेल्या पावसाने थोडी विश्रांती घेत पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे.
हिंदमाता, परळ, गोरेगाव, अंधेरी इथल्या सखल भागात पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे. नॉन स्टॉप पडणाऱ्या पावसामुळे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व उड्डाणही थांबवण्यात आली आहेत. गेल्या आठवड्यातही सुरुवातीलाच पावसाने अशीच बॅटिंग केली होती. या आठवड्यातही त्याचीच पुनरावृत्ती झाल्यामुळे मुंबई महापालिकेच्या काळजात धस नक्कीच झालं असेल.
मुंबई व उपनगर सोबत ठाणे, कल्याण, नवी मुंबई व पनवेल परिसरातही धुवांधार पाऊस पडत आहे. रेल्वे सेवाही थोडी उशिराने चालत आहे.
