मुंबईत उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना यापुढे १०० रुपयांऐवजी एक हजार रुपये इतका दंड आकारला जाणार
मुंबई, दि. २८: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांना यापुढं १०० रुपयांऐवजी एक हजार रुपये इतका दंड आकारला जाणार असल्याचं महानगरपालिकेने स्पष्ट केलं आहे. येत्या १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. उघड्यावर कचरा जाळल्यामुळे वायू प्रदूषण तसंच पर्यावरण विषयक गंभीर धोके निर्माण होत असल्याची जाणीव करून देण्यासाठी महानगरपालिकेनं दंडाच्या रकमेत दहा पटींनी वाढ केली आहे.
Source – AIR
