Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर गजानन काळे यांचा नवी मुंबई शहर अध्यक्षपदाचा राजीनामा मागे

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर गजानन काळे यांचा नवी मुंबई शहर अध्यक्षपदाचा राजीनामा मागे

नवी मुंबई: शुक्रवारी सकाळी मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु आज त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णाकुंज या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी गजानन काळे यांनी दिलेला राजीनामा फेटाळात त्यांना नवी मुंबई शहराध्यक्ष पदी कायम रहायला सांगितले. या बाबतची फेसबुक पोस्ट त्यांनी आपल्या अधिकृत पेज वरून प्रसारित केली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3519021698137947&id=1994090203964445

नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष असलेल्या गजानन काळे यांनी शुक्रवारी एक पत्रक काढून जाहीररीत्या आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. यावेळी त्यांनी मनसे नेते अभिजित पानसे तसेच मनसे ठाणे जिल्हाप्रमुख अविनाश शिंदे यांचे उघडपणे नाव घेत, नवी मुंबईतील पक्ष संघटनेतील गटबाजीला कारणीभूत असल्याचा ठपका ठेवला होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसे नेते नितीन नांदगावकर यांनीही पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून शिवसेनेत घरवापसी केली होती. पहिल्यांदाच लढवलेल्या या विधानसभा निवडणुकीत काळे यांना बेलापूर विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या क्रमांकाची २७ हजारांपेक्षा जास्त मतं पडली होती. जी लक्षणीय म्हणावीत अशीच आहेत. यामुळे असा तरुण नेता गमावणे तेही पुढील सहा महिन्यात होणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मनसेला परवडणारे नाही.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *