मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या राज्यातल्या सहा सभांच्या तारखा जाहीर
मुंबई: लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना पाडा, असे आव्हान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात केले होते. याच पार्श्वभूमीवर राज्यभरात ८-१० सभा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. राज ठाकरे राज्यभर सभा घेऊन आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.
राज ठाकरे मोदीं विरुद्ध पहिली सभा १२ एप्रिल रोजी नांदेड शहरात घेणार आहेत. नांदेडमध्ये काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांचा प्रचार राज ठाकरे करणार आहेत.
दुसरी सभा १५ एप्रिल रोजी सोलापूर येथे सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. राज ठाकरे या सभेत सुशीलकुमार शिंदे यांचा प्रचार करणार असल्याचे बोलले जात आहे.
तिसरी सभा १६ एप्रिल रोजी कोल्हापूर येथे होत या सभेत आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा प्रचार राज ठाकरे आपल्या सभेत करणार आहेत.
राज ठाकरे यांची चौथी सभा १७ एप्रिल रोजी साताऱ्यात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. राज ठाकरे उदयनराजे यांच्या प्रचारासाठी साताऱ्यात सभा घेणार आहेत.
राज ठाकरे यांची पाचवी सभा १८ एप्रिल रोजी पुण्यातील सिंहगड रोडवरील शिंदे मैदानावर होणार आहे. या सभेत राज ठाकरे राष्ट्रवादीच्या बारामतीमधील उमेदवार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे मावळमधील उमेदवार पार्थ पवार या दोघांचाही प्रचार करतील अशी चर्चा सुरु आहे.
राज ठाकरे यांची सहावी सभा १९ एप्रिल रोजी महाड, रायगड येथे होणार असून या सभेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचा प्रचार करणार आहेत.
#मोदीशाहीमुक्तभारत
राजसाहेबांच्या दौऱ्याचा तपशील खालील प्रमाणे pic.twitter.com/ACUoEPjChU— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) April 11, 2019
