Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्ये राहणार; सुजय विखे-पाटलांचा खुलासा

राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्ये राहणार; सुजय विखे-पाटलांचा खुलासा

अहमदनगर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. राधाकृष्ण विखे भाजपात प्रवेश करणार नसल्याचे खुद्द त्यांचे पुत्र आणि भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी सांगितलं आहे.

आज नगरमध्ये शिवसेना-भाजप-रिपाइं युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली. या सभेत राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी चर्चा होती. त्यांचे पुत्र व भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार सुजय यांनी आपल्या भाषणात वडिलांच्या भाजप प्रवेशाचा सस्पेन्स संपवून टाकला. ‘माझे वडील भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत. ते काँग्रेसमध्येच राहणार आहेत. काँग्रेसवर ते नाराज नाहीत. त्यांचे मतभेद राष्ट्रवादी काँग्रेसशी आहेत,’ असं सुजय यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका तळ्यात मळ्यात असल्याचे दिसत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *