Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘माईंड जिम’च्या या आठवड्यातील सेशनमध्ये नीलांबरी जोशी साधणार धनंजय देशपांडे यांच्याशी संवाद; विषय – कौटुंबिक मूल्यव्यवस्था”

‘माईंड जिम’च्या या आठवड्यातील सेशनमध्ये नीलांबरी जोशी साधणार धनंजय देशपांडे यांच्याशी संवाद; विषय – कौटुंबिक मूल्यव्यवस्था”

व्यवसाय सांभाळून कुटुंबाला वेळ द्यायला हवा..

समोरच्या माणसाचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं..

महत्वाचे निर्णय घेताना चूक बरोबर काय याची घरात निकोप चर्चा व्हायला हवी..

घरातले सणवार सगळ्यांनी एकत्र येऊन साजरे करावेत..

घरातली कामं सगळ्यांनी वाटून घ्यायला हवीत..

पैसे खर्च करताना गरज आणि चैन यातली सीमारेषा ओळखता यायला हवी..

कोणत्याही कुटुंबाच्या दृष्टिकोनातून हे नियम आवश्यक असतात. असे नियम करताना धार्मिक, सामाजिक, राजकीय, नैतिक मूल्यं जपणं हेही गरजेचं असतं. आपल्या कुटुंबाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन, विचारविनिमयानं ही मूल्यं ठरवायला आणि जोपासायला लागतात. तरच कौटुंबिक स्वास्थ्य टिकून रहातं.

“माईंड जिम”ची डिसेंबर महिन्याची कौटुंबिक स्वास्थ्य हीच थीम आहे. त्या अनुषंगानं “कौटुंबिक मूल्यव्यवस्था” या विषयावर वैयक्तिक, सामाजिक, व्यावसायिक मूल्यं उत्तमरीत्या सांभाळून जगमित्र ठरलेल्या धनंजय देशपांडे – डीडी या अवलियाची मुलाखत “माईंड जिम” ने आयोजित केली आहे. डीडीशी संवाद साधणार आहेत नीलांबरी जोशी. हा कार्यक्रम २६ डिसेंबर २०२० रोजी दुपारी ४.३० वाजता आॉनलाईन असणार आहे. सरत्या वर्षाची ही भेट एंजॉय करण्यासाठी लिंक.

Webex link : https://sigmasun.webex.com/meet/anuradhakarkare

नीलांबरी – २४ डिसेंबर २०२०

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *