लवकरच येतोय मराठी बिग बॉसचा दुसरा सिझन
मराठी बिग बॉसचे पहिले पर्व चांगलेच गाजले. अनेक भांडणं, प्रेम प्रकरणं यामुळे पहिले पर्व चर्चेत राहिले होते. त्यामुळे चाहते बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वाची वाट पाहत होते. अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली असून लवकरच बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन येणार आहे. कलर्स वाहिनीने बिग बॉसचा टिझर रिलीज केला होता.
या शो मध्ये कोणते कलाकार सहभागी होणार आहेत हे मात्र स्पष्ट झालेले नाही. मात्र झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतील आधीची शनाया म्हणजेच रसिका सुनील हिचे नाव सध्या चर्चेत आहे.
मार्च महिन्यातच दुसऱ्या सिझनचा टिझर रिलीज झाला आहे. त्यामुळे एप्रिल महिन्या अखेर पर्यंत हा शो सुरू होऊ शकतो.
तो परत येतोय… #BiggBossMarathi #BBMarathi #ColorsMarathi pic.twitter.com/K3coqCNuNU
— Colors Marathi (@ColorsMarathi) March 17, 2019