नवी मुंबई जिल्हा महिला काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी सुदर्शना कौशिक यांच्या उपस्थितीत जाहीर
वाशी: नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी पाठोपाठ नवी मुंबई जिल्हा महिला काँग्रेस कमिटी ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. म.प्र.म.कॉ.उपाध्यक्षा व कोंकण प्रभारी सौ. सुदर्शनाताई कौशिक , म.प्र.म.कॉ.ज.सें.चंद्रकलाताई नायडू, म.प्र.म.कॉ.सें. व प्रवक्ता नीलाताई लिमये . सोशल मीडिया व प्रवक्त्या मा. चित्राताई बाथम यांच्या उपस्थिती मध्ये महिला कार्यकर्त्यांना वाशी येथील काँग्रेस भवन येथे पदभार देण्यात आला. या प्रसंगी सौ. उज्वला साळवे यांची नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष म्हणून नेमणूक करून त्यांचा सत्कार करण्यात आला.