यावर्षीपासूनच वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण होणार लागू
मुंबई: मराठा समाज आरक्षण प्रकरणी नुकताच निकाल लागला व शिक्षण तसेच नोकरी मध्ये आरक्षणावर शिक्कामोर्तब झालं. पण यानंतरही याविरोधात वेगवेगळ्या याचिका दाखल केला जात आहेत.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशांमध्ये देण्यास विरोध करणारी याचिका नुकतीच दाखल करण्यात आली होती. परंतु उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली. यानंतर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेशांत आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचिकाकर्त्यांनी मागणी केली होती की वैद्यकीय प्रवेशांमध्ये मराठा आरक्षण या वर्षीपासून लागू करु नये. हे आरक्षण २०१९-२० या वर्षापासून लागू करण्यात यावे. तसेच राज्य सरकारने केलेली एसईबीसी कायद्यातील सुधारणा अवैध ठरवण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली होती. पण राज्य सरकारकडून करण्यात आलेला दावा कोर्टाने स्वीकारत याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळण्यात आली.
