Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

एल अॅण्ड टी फायनान्स यंदाच्या तिमाहीत ५० हून अधिक शहरात विस्तारणार आपला एसएमई वित्तसहाय्य व्यवसाय

  • सर्वोत्कृष्ट आकर्षक व्‍याजदर, तारण-मुक्त कर्ज
  • व्यवसायाच्या आरंभापासून आत्तापर्यंत ६,५०० हून अधिक ग्राहक जोडले
  • विविध उत्पादनांचा विस्तार-ग्राहकांच्या रोख प्रवाहाशी मिळती-जुळती ड्रॉपलाइन ओव्हरड्राफ्ट सुविधा
  • पटणा, भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमसह ५० शहरांमध्ये विस्ताराची कंपनीची योजना

मुंबई, दि. २१: देशातील अग्रगण्य बिगर बँकिंग (नॉन बँकिंग) वित्तीय कंपन्यांपैकी एक असलेल्या एल अॅण्ड टी फायनान्स लिमिटेड (एलटीएफ) ने ३० जून २०२३ रोजी संपणाऱ्या या तिमाहीत आपल्या एसएमई फायनान्स व्यवसायाचा ५० हून अधिक शहरांमध्ये विस्तार करण्याची योजना आखली आहे. कंपनीने वित्तीय वर्ष २०२२ मध्ये मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या एसएमई वित्तसहाय्य व्यवसायाने गेल्या आर्थिक वर्षात सातत्याने वाढ साध्य केली आहे.

स्वयंरोजगारीत व्यावसायिक आणि व्यवसायांच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने कंपनीचा हा व्यवसाय कार्य करतो, त्याचबरोबर एल अॅण्ड टी फायनान्सला उच्च श्रेणीची डिजिटल रिटेल फायनान्स कंपनी म्हणून स्थापित करण्याचे लक्ष्य २०२६ या ध्येयाकडेही वाटचाल करत आहे.

बाजारातील प्रचलित प्रथांना बाजूला सारत, कंपनीने आपल्या विद्यमान सक्षम अशा डिजिटल आणि डेटा विश्लेषण क्षमतांच्या आधारावर आपल्या सेवा पूर्णपणे पेपरलेस प्रक्रियेवर आधारित ठेवल्या आहेत. लघु आणि मध्यम उद्योगांना रोख निधीच्या प्रवाहाचा अंदाज आवश्यक असतो आणि अशा बाजारपेठेत एल अॅण्ड टी फायनान्स उद्योजकांच्या कर्जाच्या अर्जावर त्वरित मंजूरी किंवा नकाराची माहिती प्रदान करण्याच्या बाबतीत सक्षम आहे. एंड-टू-एंड डिजिटल प्रक्रियेमुळे कंपनीला आपल्या वितरण विभागाच्या (चॅनेल) जलद विस्ताराला मदत करण्यासोबतच ग्राहकांसाठी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी कार्यवाही पुर्ण करणे शक्यही झाले आहे.

नवीन योजनेबाबत बोलताना एल अॅण्ड टी फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिनानाथ दुभाषी म्हणाले की, लार्सन अँड टुब्रो समूह नेहमीच राष्ट्र उभारणीशी जोडला गेलेला आहे. आपल्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये लघु आणि मध्यम उद्योग हे सर्वात मोठे योगदान देणारे घटक आहेत. विशेषतः टियर टू शहरांमध्ये जेथे आम्ही एसएमईंना त्यांच्या वाढीच्या वाटचालीत मदत करण्याची योजना आखलेली आहे, तेथे या क्षेत्रासाठी आमच्या डिजीटल सेवा ‘फिनटेक@स्केल’ बनण्याच्या आमच्या लक्ष्य २०२६ च्या संकल्पानुसार आहेत. मला विश्वास आहे की, कर्जदारांसोबतची ही भागीदारी देशाला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्यास मदत करेल.

ग्राहकांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवण्याच्या मार्गदर्शक तत्त्वासह, कंपनीने नोव्हेंबर २०२२ मध्ये आपल्या ग्राहकांसाठी ड्रॉपलाइन ओव्हरड्राफ्ट सुविधा सुरू केली, जी दैनंदिन कॅशफ्लो गरजांशी मिळतीजुळती राहण्यासाठी ग्राहकांना प्री-पे आणि कर्ज खात्यातून पैसे काढण्याची परवानगी देते. या सेवेच्या समावेशामुळे कंपनीला वितरणात सातत्याने वाढ साध्य झाली आहे. सध्या, कंपनी मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, बेंगळुरू आणि अहमदाबाद या प्रमुख बाजारपेठांसह सोळा शहरांमध्ये एसएमई ग्राहकांच्या गरजा पूर्ण करत आहे.

टियर-टू शहरांमधील एसएमई ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यावर भर देताना, कंपनीने मोठ्या भौगोलिक विस्ताराची योजना आखली आहे आणि ती व्यवसायासाठी एक महत्त्वाची वाढ आहे. पटणा, भुवनेश्वर आणि विशाखापट्टणमसह ५० शहरांमध्ये विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे. या व्यतिरिक्त, कंपनी आपल्या डायरेक्ट टू कस्टमर (डीटूसी) अॅप्लिकेशन – प्लॅनेट अॅपद्वारे यंदाच्या आर्थिक वर्षात थेट वितरण (चॅनेल) वाढवण्याच्या दिशेने देखील काम करणार आहे.

एल अॅण्ड टी फायनान्सचे हे उत्पादन प्रामुख्याने लघुउद्योजक आणि डॉक्टर्स, चार्टर्ड अकाउंटंट इत्यादींसारख्या व्यावसायिकांना मदत पुरवते आणि ५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज वितरित करते. लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यावसायिक एकतर कंपनीच्या वेबसाइटद्वारे किंवा ईमेलद्वारे अथवा जवळच्या एल अॅण्ड टी फायनान्सच्या शाखेला प्रत्यक्ष भेट देऊन कर्जासाठी डिजिटल पद्धतीने आपला अर्ज करू शकतात.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *