लाडकी बहीण योजनेत परराज्यातल्या लाभार्थ्यांची घुसखोरी
मुंबई, दि. ३०: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत परराज्यातल्या लाभार्थ्यांनी बोगस लॉगिन आयडी तयार करून तब्बल ११७१ अर्ज दाखल केले असल्याचं समोर आलं आहे. हे भामटे उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थान मधले असल्याचं पोलीस, महसूल आणि महिला बाल विकास विभागाने केलेल्या तपासात आढळलं आहे. संबंधित अर्जदारांचा लाभ थांबवण्यात आला आहे. यातले २२ अर्ज सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यातून खोट्या कागदपत्रांच्या आधारे भरल्याचं आढळलं असून त्याबाबत बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Source – AIR
