राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा; एका तासातच जामीन मंजूर
नाशिक, दि. २०: राज्याचे कृषिमंत्री आणि सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. १९९५ ते १९९७ कालावधीमध्ये माणिकराव कोकाटे यांनी आपल्याला स्वतःचे घर नसल्याचे खोटे कागदपत्र देऊन नाशिकच्या बॉईज टाऊन परिसरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये मुख्यमंत्री कोट्यातून घर मिळवले होते. त्याचप्रमाणे इतर दोन लाभार्थ्यांची घर देखील स्वतःच्या नावावर करून घेतली. या प्रकरणातील खटला २८ वर्ष हा खटला चालल्यानंतर आज कोर्टाने कोकाटे यांना दोन वर्ष कारावास पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
कोर्टाच्या निकालानंतर कोकाटे यांनी जामिनासाठी अर्ज केला व त्यावर तात्काळ सुनावणी होत त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने शिक्षा ठोठावल्यामुळे त्यांचे मंत्रिपद व आमदारकी धोक्यात आल्याचे सांगितले जाते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Source – AIR
