Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उलवे नोड परिसरात कायमस्वरूपी रक्तपेढीसाठी किरण मढवी यांचे तहसिलदारांना निवेदन

उलवे नोड परिसरात कायमस्वरूपी रक्तपेढीसाठी किरण मढवी यांचे तहसिलदारांना निवेदन

उरण, दि.१५(विठ्ठल ममताबादे): रक्तदानाची जागरुकता मोठ्या प्रमाणावर निर्माण होण्यासाठी जगभर १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा होत असतो, आणि याच दिनाचे औचित्य साधून उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण एकनाथ मढवी यांनी पनवेल येथील श्री साई ब्लड बँकेत जाऊन रक्तदान करुन सर्वप्रथम जागतिक रक्तदाता दिनाचा संकल्प पूर्ण केला. तसेच सर्वांनी या दिनाचे औचित्य साधुन रक्तदान चळवळीमधे सक्रीय होण्याचा संकल्प करावा असेही आवाहन किरण मढवी यांनी केले. यावेळी त्यांना रक्तदात्याचे प्रमाणपत्र श्री साई रक्तपेढीचे प्रमुख सुनिल पाटील आणि रायगड भुषण मनोज पाटील यांच्या शुभहस्ते देण्यात आले.

त्यांनतर किरण मढवी यांनी पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांना प्रत्यक्ष भेटून उलवेनोड परिसरातील नागरिकांना हाकेच्या अंतरावर रक्त सहज उपलब्ध होण्यासाठी आणि अनेक रक्तदात्यांना आरोग्यसेवेकरिता रक्तदान करण्यासाठी कायमस्वरुपी रक्तपेढी व्हावी याकरिता तहसिलदार तळेकर यांच्याकडे मागणी पत्र दिले. तहसीलदार विजय तळेकर यांनी यासाठी सकारात्मक भूमिका घेतली असून याबाबत आपण प्रयत्न करणार असल्याचे तहसीलदार तळेकर यांनी सांगितले

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *