तब्बल 16 वर्षांनंतर पूजा बेदी पुन्हा एकदा अडकणार लग्नबंधनात
अभिनेत्री आणि स्तंभलेखिका पूजा बेदी हिला घटस्फोटानंतर तब्बल 15 वर्षांनी तिच्या स्वप्नातला प्रिन्स चार्मिंग सापडला आहे.
48 वर्षीय पूजा बेदी बॉयफ्रेण्ड मानेक काँट्रॅक्टरसोबत
लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. पूजा आणि मानेक यांचा साखरपुडा व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर झाला. २००३ मध्ये याच दिवशी पूजाचा घटस्फोट झाला होता. पहिला पती इब्राहिम फर्निचरवाला याच्याशी पूजाने १९९० मध्ये लग्न केले होतं.
पूजा बेदी आणि मानेक काँट्रॅक्टर शाळेपासूनचे मित्र आहेत. हिमाचल प्रदेशच्या द लॉरेन्स स्कूल सनावर इथे दोघांचं शिक्षण झालं. शाळेत मानेक पूजाला सीनियर होता. मात्र नंतर ते आपापल्या आयुष्यात व्यस्त झाले. मागील वर्षी पुन्हा त्यांची भेट झाली. दोघांमध्ये प्रेम झालं आणि आता त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे.
