Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

अभिनेत्री स्मिता तांबेचं ‘सावट’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

अभिनेत्री स्मिता तांबेचं ‘सावट’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सशक्त स्त्री व्यक्तिरेखांमुळे अभिनेत्री स्मिता तांबे आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. आता स्मिता तांबे एका महिला सशक्तीकरणावरच्याच चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करतेय.

सौरभ सिन्हा दिग्दर्शित सुपरनॅचरल थ्रिलर असलेल्या ‘सावट’ या चित्रपटाची निर्मिती ‘निरक्ष फिल्म्स’ आणि ‘लेटरल वर्क्स प्रा लि.’ सोबतच स्मिता तांबेचं ‘रिंगींग रेन’ प्रॉडक्शन हाऊस करत आहे. सावट हा चित्रपट 22 मार्च 2019 ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

‘रिंगीग रेन’ आणि ‘निरक्ष फिल्म’च्या सहयोगाने ‘लेटरल वर्क्स प्रा.लि.’प्रस्तुत, स्मिता तांबे, हितेशा देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित, सौरभ सिन्हा दिग्दर्शित ‘सावट’ चित्रपटात स्मिता तांबे यांसह मिलिंद शिरोळे, संजीवनी जाधव आणि श्वेतांबरी मुख्य भूमिकेत आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *