Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“खांदेश्वर रेल्वे स्थानका बाहेरील भूखंडाचे आरक्षण का हटवले?” आ. बाळाराम पाटील यांची हिवाळी अधिवेशनात चौकशीची मागणी

“खांदेश्वर रेल्वे स्थानका बाहेरील भूखंडाचे आरक्षण का हटवले?” आ. बाळाराम पाटील यांची हिवाळी अधिवेशनात चौकशीची मागणी

पनवेल/नागपूर: नवी मुंबई पनवेल विभागातील कामोठे सेक्टर-२८ जवळ खांदेश्वर रेल्वे स्थानकाबाहेर एका भूखंडावर सिडको तर्फे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून निवासी प्रकल्प सुरु होत आहे. या भूखंडावर आधी खांदेश्वर प्लाझा आणि बस टर्मिनलसाठीचे आरक्षण होते. पण अचानक यावरील आरक्षण हटवून येथे निवासी प्रकल्पाचा घाट घालण्यात आला. याच संदर्भात नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानपरिषद सदस्य आ. बाळाराम पाटील यांनी याच विषयाकडे सरकारचं लक्ष वेधलं. यात ते म्हणाले कि, “पनवेल येथील सेक्टर २८ खांदेश्वर रेल्वे स्थानक आणि मानसरोवर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या भूखंडावर सध्या पार्किंगसाठी वापरात तसेच खेळाचे मैदान म्हणून वापरात येत आहे, सदरील भूखंड हा नियोजित खांदेश्वर प्लाझासाठी व बस टर्मिनलचे आरक्षण होते. यासाठी १२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आलेला होता. परंतु सिडकोने येथील नागरिकांना अंधारात ठेवून अचानकपणे लोखंडी संरक्षण लावण्यास सुरुवात केलेले नागरिकांच्या लक्षात आले. सदरील भूखंडावर असलेले आरक्षण बदलून सिडको महामंडळाने या ठिकाणी असलेल्या भूखंडावर पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ११ माळ्यांच्या १७ इमारती बांधण्यात येणार असल्याचे समजते.” पुढे त्यांनी या भूखंडावर असलेले नियोजित आरक्षण का हटवण्यात आले याची सखोल चौकशी करण्याची व आधी असलेले नियोजित प्रकल्पाचे आरक्षण तसेच ठेवावे अशी मागणी केली.

या प्रकरणी पनवेल मधील राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. मागील भाजप सरकारच्या काळात पनवेलचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर हे सिडको चे अध्यक्ष होते. आमदार बळीराम पाटील यांचा रोख त्यांच्याकडेच असल्याचे कळते. शेतकरी कामगार पक्ष सध्या महाविकास आघाडीचा घटक असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात हे पाहणे लक्षणीय ठरेल.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *