Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आ. राजन साळवी यांनी दुग्धविकास मंत्र्यांकडे केली रत्नागिरी जिल्ह्यातील दूध उत्पादकांची थकीत रक्कम त्वरित देण्याची मागणी

आ. राजन साळवी यांनी दुग्धविकास मंत्र्यांकडे केली रत्नागिरी जिल्ह्यातील दूध उत्पादकांची थकीत रक्कम त्वरित देण्याची मागणी

रत्नागिरी/नागपूर: राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी हे काही दिवसांपूर्वी साखरपा जिल्हा परिषद आभार दौऱ्यावर आले असता तेथील दुग्ध संस्था चालक नारायण सुर्वे (श्रीदेव विरोब सहकारी दुग्ध व्यवसाय संस्था मर्या मेढे) व अजय सावंत (कोंडगाव दुग्ध व्यवसाय सहकारी संस्था कोंडगाव) यांनी भेट घेऊन दुग्ध संस्थेचे दुधाचे पेमेंट उशिराने होत असल्याबाबत निवेदन देऊन यावर सध्या चालू असलेल्या नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची निवेदनाद्वारे विनंती केली होती.

काल (दि. १७) हिवाळी अधिवेशना च्या दुसऱ्या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजन साळवी यांनी शालेय शिक्षण, महसूल व दुग्धविकासमंत्री श्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेत दुग्ध संस्थेचे दुधाचे पेमेंट उशिराने होत असल्याबाबत निवेदन दिले. राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघा तील शेतकरी शेतीला जोड धंदा म्हणून दुधाचे उत्पादन करतो आणि मिळणारे दूध हे दुग्ध व्यवसाय सहकारी संस्थातर्फ तो शासकीय योजनेस दूध पुरवठा करतो. परंतु सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर या एकूण तीन महिन्याचे दुधाची रक्कम शासनाकडून शेतकऱ्यांना मिळालेली नसल्यामुळे दुग्धोत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तरी आपण याकडे विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे लवकरात लवकर मिळवून द्यावेत” असे निवेदन आमदार राजन साळवी यांनी दिले असता मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चालू हिवाळी अधिवेशना मध्ये अतिरिक्त पुरवणी मागण्या मध्ये पैशाची मागणी करणार असल्याचे हमी देत तात्काळ जिल्हा दुग्धविकास अधिकारी, रत्नागिरी यांना शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे लवकरात लवकर देण्याबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *