केजरीवालांची आप ५७ ठिकाणी आघाडीवर तर भाजपची मोठी घसरण
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी सध्या चालू आहे. सकाळ पासून सुरू झालेल्या मतमोजणीत सुरुवातीपासून ‘आम आदमी पक्षाचं’ पारड जड दिसतंय. जवळपास ७० पैकी ५७ जागी आप आघाडीवर आहे. तर काँग्रेसचा कुठेच नामोनिशाण पहायला मिळत नाहीये. या निवडणुकीत प्रचारादरम्यान आप आणि भाजप मध्ये घमासान युद्ध पाहायला मिळाले.