‘या’ विभागात होणार आहे राज्य शासनाची नोकरभरती
मुंबई: गेले बराच काळ ताटकळत पडलेल्या राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या पदांच्या भरतीला लवकरच सुरुवात होणार आहे. मराठा आरक्षणाच्या सुधारणा विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केल्यानंतर या मेगा भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
येत्या आठवड्यात पहिल्या टप्प्याच्या नोकर भरतीला सुरुवात होणार असून साधारण २० हजार जागांसाठी जाहिराती निघाल्या आहेत. तर उर्वरित रिक्त जागांसाठीच्या जाहिरातीही येत्या काळात निघतील.
विभागवार भरतीची आकडेवारी
वित्त (ऑडिट) – ९५९
वनसंरक्षक – १५००
ग्रामविकास विभाग – १३,०००
सार्वजनिक बांधकाम विभाग – ४३५
आरोग्य – ८००
कृषी – १५८५
जलसंधारण – २५०
