Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

इस्रोवर संपूर्ण देशभरातून होतोय सांत्वन व शुभेच्छांचा वर्षाव

इस्रोवर संपूर्ण देशभरातून होतोय सांत्वन व शुभेच्छांचा वर्षाव

मध्यरात्री एक वाजून ५५ मिनिटांनी विक्रम लँडर चंद्राच्या २.१ किलोमीटर अंतरावर पोहोचलं आणि त्याचा इस्रो शी संपर्क तुटला आणि त्याच क्षणी इस्रो च्या वैज्ञानिकांसह संपूर्ण देशवासीयांच्या काळजाचा ठोका चुकला. अद्याप संपर्क करण्याचा प्रयत्न चालूच असल्याचे कळते. सध्या शास्त्रज्ञांकडून माहिती विश्लेषण(डेटा अनालीसीस)चं काम चालू आहे. चंद्रयान-२ मोहिमेत ज्या शास्त्रज्ञांचा, अभियंत्यांचा सहभाग राहिला ते एकमेकांना धीर देताना दिसले.

आज सकाळी इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. यावेळी के. सिवन यांनी त्यांना मिठी मारून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. नरेंद्र मोदींनीही त्यांना धीर दिला. याचसोबत इस्रोतील शास्त्रज्ञांनी चांद्रयान-२ मोहिमेत केलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. मध्यरात्री इस्रो तर्फे विक्रम संपर्क तुटल्याचे जाहीर झाले आणि त्यानंतर संपूर्ण देशभरातून इस्त्रोच्या शास्त्रज्ञांवर मोहिमेत अडचण घेऊनही सांत्वन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर IAmWithISRO आणि ProudofISRO हे हॅशटॅग व्हायरल झाले आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *