Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

हॉटेल सेंटर पॉईंट कडून एमआयडीसी भूखंडावर अतिक्रमण

नवी मुंबईतील हॉटेल सेन्टर पॉईंट कडून एमआयडीसी भूखंडावर अतिक्रमण

वाशी-तुर्भे :  नवी मुंबईतील तुर्भे परिसर आणि अतिक्रमण हे समीकरण काही नवे नाही. पण ह्या अध्यायात सध्या एका नव्या प्रकरणाची भर पडली आहे. तुर्भे नाका येथील सेंटर पॉईंट हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स (Centre Point Hotels & Resorts) कडून गार्डन साठी राखीव असलेल्या एमआयडीसी च्या भूखंडाचा बेकायदेशीर वापर चालू असल्याचा आरोप नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वैभव सावंत यांनी केला आहे. या हॉटेल चे व्यवस्थापन व ह्या भूखंडाचा अवैधरित्या वापर करण्यास ज्या अधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे अशा साऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. ९६० स्क्वेअर मीटर चा सदर भूखंड क्र. एम/११/१ ‘हॉटेल सेंटर पॉईंट’ जवळ आहे. ह्या भूखंडाला लोखंडी भिंत उभारून व्यवस्थापनाने बेधडकपणे त्याचा वाणिज्य वापर सुरू केला आहे. या विरोधात अनेक तक्रारी करूनदेखील एमआयडीसी चे अधिकारी त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे कळते.

सार्वजनिक वापराच्या ह्या भूखंडाचा गैरवापर थांबवून त्यावर गार्डन विकसित करावे तसेच ह्या भूखंड घोटाळ्यात सामील असलेल्या हॉटेल व्यवस्थापनावर व त्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अन्यथा नवी मुंबई जिल्हा काँग्रेस तर्फे येत्या काळात मोठं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सावंत यांनी दिला आहे.

आपली समस्या विशेष टीप : सध्या ठाणे – बेलापूर मार्गावर मुळात गार्डन ची संख्या फार कमी आहे. आणि जी आहेत ती सर्व दारुडे, गर्दुल्ले यांनी व्यापलेली आहेत किंवा ढिसाळ कारभारामुळे बंद आहेत. रेटारेटीच्या जीवनात मोकळा श्वास घेण्यासाठी, आपल्या परिवारासोबत चांगला वेळ व्यतीत करण्यासाठी नवी मुंबईकरांना विशेषतः तुर्भे आणि परिसरातील नागरिकांना फारच थोडे पर्याय उपलब्ध आहेत. त्यावरही असे अतिक्रमण होणार असेल तर प्रशासन हे उत्तरदेही आहे. या आठवड्यात महाराष्ट्र वार्ता (आपली समस्या) टीम हॉटेल सेंटर पॉईंट च्या अतिक्रमित भागाला भेट देऊन एमआयडीसी चे प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांची अधिकृत प्रतिक्रिया जाणून घेणार आहे.

‘आपल्या समस्या’ आम्हाला पाठवा आम्ही त्या आमच्या प्रभावी माध्यमावर मांडू. ‘आपली समस्या’ या आमच्या उपक्रमाच्या यशस्वितेचे (Success Ratio) प्रमाण ९०% आहे. धन्यवाद !

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *