Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह टीका भोवणार

हर्षवर्धन जाधव यांना उद्धव ठाकरे यांच्यावरील आक्षेपार्ह टीका भोवणार

कन्नड: औरंगाबाद मधील कन्नड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी तीन दिवसांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीची आक्षेपार्ह टीका केली होती. ही टीका आता त्यांना भलतीच भोवण्याची शक्यता आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आचारसंहिता भंगाचा गुन्हा कन्नड पोलीस स्थानकात दाखल करण्यात आला आहे.

तीन दिवसांपूर्वी एका सभेत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह टीका केली होती. ज्यानंतर शिवसैनिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. या प्रकरणा नंतर औरंगाबाद येथील शिवसेना नगरसेवक राजू वैद्य यांनी येथील पोलीस स्थानकात जाधव यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. हर्षवर्धन जाधव हे भाजपचे माजी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्याचा फटका खैरेंना बसला आणि ते एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून पराभूत झाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *