Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

फेब्रुवारी २०२३ मध्ये एकूण जीएसटी पोटी ₹ १,४९,५७७ कोटी महसूल झाला जमा

गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा यंदा १२% जास्त

सलग १२ महिने १.४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मासिक जीएसटी महसूल जमा

मुंबई, दि. १: फेब्रुवारी 2023 मध्ये जीएसटी (GST) पोटी जमा झालेला एकत्रित महसूल ₹1,49,577 कोटी इतका आहे. त्यापैकी सीजीएसटी (CGST) ₹27,662 कोटी, एसजीएसटी (SGST) ₹34,915 कोटी, आयजीएसटी (IGST) ₹75,069 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा झालेल्या ₹35,689 कोटींसह) आणि उपकर ₹11,931 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा झालेल्या ₹792 कोटींसह) आहे.

सरकारने आयजीएसटी मधून नियमित थकबाकीपोटी ₹34,770 कोटी सीजीएसटी आणि ₹29,054 कोटी एसजीएसटी ची थकबाकी दिली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये नियमित थकबाकी नंतर केंद्र आणि राज्यांकडून जमा झालेला एकूण महसूल, CGST साठी ₹62,432 कोटी आणि SGST साठी ₹63,969 कोटी इतका आहे. याव्यतिरिक्त, केंद्राने शिल्लक GST भरपाई पोटी, जून 2022 या  महिन्यासाठी ₹16,982 कोटी, तर आधीच्या कालावधीसाठीची AG प्रमाणित आकडेवारी  पाठवणारी राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांना ₹16,524 कोटी रक्कम जारी केली होती.

फेब्रुवारी 2023 मध्ये जीएसटी पोटी गोळा झालेला महसूल, मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 12% जास्त आहे, जो  रु. 1,33,026 कोटी इतका होता. या महिन्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत वस्तूंच्या आयाती द्वारे जमा झालेला महसूल 6% जास्त आहे आणि देशांतर्गत व्यवहारातून मिळणारा महसूल (सेवांच्या आयातीसह) 15% जास्त आहे. जीएसटी लागू झाल्यापासून या महिन्यात उपकारा पोटी ₹11,931 कोटी इतका आतापर्यंतचा सर्वाधिक महसूल जमा झाला. साधारणपणे, फेब्रुवारी हा 28 दिवसांचा महिना असल्याने, तुलनेने कमी महसूल जमा होतो.

खालील तक्ता चालू वर्षातील एकूण मासिक जीएसटी महसुलाची आकडेवारी दर्शवितो. फेब्रुवारी 2022 च्या तुलनेत फेब्रुवारी 2023 मधील जीएसटीची राज्यवार आकडेवारी पुढील तक्ता दर्शवितो.

फेब्रुवारी 2023 ची  जीएसटी महसुलामधील  राज्यवार वाढ[1]

State Feb-22 Feb-23 Growth
Jammu and Kashmir 326 434 33%
Himachal Pradesh 657 691 5%
Punjab 1,480 1,651 12%
Chandigarh 178 188 5%
Uttarakhand 1,176 1,405 20%
Haryana 5,928 7,310 23%
Delhi 3,922 4,769 22%
Rajasthan 3,469 3,941 14%
Uttar Pradesh 6,519 7,431 14%
Bihar 1,206 1,499 24%
Sikkim 222 265 19%
Arunachal Pradesh 56 78 39%
Nagaland 33 54 64%
Manipur 39 64 64%
Mizoram 24 58 138%
Tripura 66 79 20%
Meghalaya 201 189 -6%
Assam 1,008 1,111 10%
West Bengal 4,414 4,955 12%
Jharkhand 2,536 2,962 17%
Odisha 4,101 4,519 10%
Chhattisgarh 2,783 3,009 8%
Madhya Pradesh 2,853 3,235 13%
Gujarat 8,873 9,574 8%
Dadra and Nagar Haveli 260 283 9%
Maharashtra 19,423 22,349 15%
Karnataka 9,176 10,809 18%
Goa 364 493 35%
Lakshadweep 1 3 274%
Kerala 2,074 2,326 12%
Tamil Nadu 7,393 8,774 19%
Puducherry 178 188 5%
Andaman and Nicobar Islands 22 31 40%
Telangana 4,113 4,424 8%
Andhra Pradesh 3,157 3,557 13%
Ladakh 16 24 56%
Other Territory 136 211 55%
Centre Jurisdiction 167 154 -8%
Total 98,550 1,13,096 15%

 

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *