Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“कारवाईपूर्वी राऊत यांचं म्हणणं तपासून पाहण्याची गरज आहे” – अजित पवार

संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याच्या मागणीसाठी सभागृहात गदरोळ

मुंबई, दि. १: खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी करत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदरोळ केला. गोंधळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. विधानसभेत अतुल भातखळकर आणि भरत गोगावले यांनी हक्कभंगाची सूचना दिली होती. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी या मागणीला पाठिंबा दिला होता.

विधिमंडळाबाबत कोणीही असे उद्गार काढणं गैर आहे मात्र कारवाईपूर्वी राऊत यांचं म्हणणं तपासून पाहण्याची गरज आहे अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनी मांडली. याप्रकरणी येत्या दोन दिवसात चौकशी करुन येत्या ८ मार्चला पुढचा निर्णय जाहीर करू अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली.

राऊत यांचे वक्तव्य अतिशय अपमानास्पद असून हा विधिमंडळ सदस्यांसह, संविधान आणि संपूर्ण राज्यातल्या नागरीकांचा अपमान आहे, असं नार्वेकर म्हणाले. विधानसभा सदस्यांच्या विशेषाधिकारांचं संरक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. अध्यक्षांच्या या घोषणेनंतरही सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी हौद्यात येऊन गोंधळ घातला. त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. विधानपरिषदेतही या मुद्यावरून गोंधळ झाल्यानं दिवसभरासाठी कामकाज स्थगित झालं.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *