Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गोव्याच्या  मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांनी घेतली शपथ

गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांनी घेतली शपथ

पणजी: गोवा विधानसभेचे अध्यक्ष डाॅ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी(काल) मध्यरात्री २ वाजता गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी प्रमोद सावंत यांना राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.

प्रमोद सावंत यांच्यासोबतच महाराष्ट्र गोमंतक पक्षाच्या सुदीन ढवळीकर आणि गोवा फाॅरवर्ड पक्षाच्या विजय सरदेसाई या दोघांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यासोबत महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि अपक्ष ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात प्रमोद सावंत यांचा शपथविधी सोहळा पार पडला.

मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यात राजकीय आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर रात्री मुख्यमंत्रिपदासाठी भाजपचे विधानसभाध्यक्ष प्रमोद सावंत यांचे नाव निश्चित झाले.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *