Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गिरीश महाजनांनी दिले राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत स्पष्टीकरण

गिरीश महाजनांनी दिले राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत स्पष्टीकरण

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर भाजपात प्रवेश करण्याबाबत निर्णय घेणार आहेत, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

भाजप पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वागतासाठी तयार आहे. सध्या ते काँग्रेसमध्येच राहणार असून लोकसभा निवडणूक निकालानंतर ते भाजप प्रवेशाबाबत योग्य दिवशी निर्णय घेणार असल्याचेही महाजनांनी यावेळी सांगितले.

नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत विखेपाटील भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र,विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही. माझे वडील भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत. ते काँग्रेसमध्येच राहणार आहेत. काँग्रेसवर ते नाराज नाहीत. त्यांचे मतभेद राष्ट्रवादी काँग्रेसशी आहेत,’ असं सुजय यांनी स्पष्ट केलं होतं.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आता कुठे पूर्णविराम लागत होता, त्यात आज गिरीश महाजन यांनी केलेल्या व्यक्तव्यामुळे विखे पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *