भारताचे ५२वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी घेतली शपथ
नवी दिल्ली, दि. १४: आज (दि. १४ मे २५) सकाळी १०:०० वाजता राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडपात झालेल्या एका समारंभात, न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्यांनी राष्ट्रपतींच्या साक्षीने शपथ घेतली. या शपथग्रहण समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीश धनखर, लोकसभेचे सभापती ओमप्रकाश बिर्ला, गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती. गवई यांच्या मातोश्री देखील या सोहळ्यास उपस्थित होत्या. न्यायमूर्ती भूषण गवई पुढचे ६ महिने १० दिवस या पदावर कार्यरत राहतील.
Source – AIR
