Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

गौतम गंभीरची राजकारणात जोरदार एंट्री, भाजपमध्ये प्रवेश

गौतम गंभीरची राजकारणात जोरदार एंट्री, भाजपमध्ये प्रवेश

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, रवीशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत गौतम गंभीर याने भाजपात प्रवेश केला. गेल्या काही दिवसांपासून गौतम गंभीर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. आज, तो अधिकृरित्या भाजपमध्ये दाखल झाला आहे.

नरेंद्र मोदींच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपात प्रवेश केला असल्याचं यावेळी गौतम गंभीरने सांगितलं. देशासाठी काम करण्याची संधी दिल्याबद्दल यावेळी गौतम गंभीरने भाजपचे आभार मानले. गौतम गंभीरने भाजपात प्रवेश केल्याने पक्षाला नक्कीच फायदा होईल असा विश्वास अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे.

आर्मीमध्ये जाता आले नसले तरी शहीद जवानांच्या मुलांसाठी गंभीर आपल्या एनजीओच्या माध्यमातून कार्य करत आहे. गंभीरने जवानांच्या 50 मुलांना आपल्या संस्थेच्या माध्यमातून मदत केली होती. यामुळेच गंभीरला यावेळीच दिल्लीतून लोकसभेचे तिकीट दिले गेले आहे असे म्हंटले जाते.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *