Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

राज ठाकरे यांच्या जन्मदिनी मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे वाटणार ५३ हजार पुस्तकं

उत्तमोत्तम लेखकांच्या १०० पुस्तकांची नवी मुंबईकरांसाठी विशेष मेजवानी

नवी मुंबई, दि.१२: १४ जून हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्मदिन. या दिवशी राज यांचे राज्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते विविध कार्यक्रम घेत त्यांचा वाढदिवस साजरा करतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी राज ठाकरे यांचा ५३वा वाढदिवस हटके पद्धतीने साजरा करण्याचे ठरविले आहे.

आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त गजानन काळे यांनी ‘पुस्तक घरोघरी’ उपक्रमांतर्गत नवी मुंबईकरांसाठी ५३ हजार पुस्तक वाटपाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानिमित्ताने वाचन व वाचक चळवळ वृद्धिंगत व्हावी असा त्यांचा मानस आहे. यास त्यांनी ‘ज्ञानार्पण सोहळा’ असे नाव दिले आहे. काल दि. ११ जून रोजी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून त्यांनी या उल्लेखनीय उपक्रमाची घोषणा केली. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या पुस्तकांप्रति असलेल्या प्रेमाचे अनेक दाखले दिले.

Video पहा

१४ जून २०२१ ते १४ जून २०२२ असे वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत नवी मुंबईतील ५३ हजार घरांत पुस्तकं वाटप केली जाणार आहेत. यात प्रामुख्याने मराठी पुस्तकं असतील व जर मागणी आली तर आम्ही हिंदी व इंग्रजी पुस्तकही उपलब्ध करून देऊ असे काळे यावेळी म्हणाले. मराठीतल्या उत्तमोत्तम अशा जवळपास १०० पुस्तकांतून आपलं आवडीचं पुस्तक निवडण्याची मुभा वाचकांना देण्यात आली आहे. पुस्तकांची नोंदणी करण्यासाठी खालील प्रमाणे लिंक वर नोंदणी करता येऊ शकते शिवाय सोबतच्या व्हाट्सअप्प क्रमांकावर ही संपर्क साधता येऊ शकतो.

https://forms.gle/7tssNvEwXPiki5J67

किंवा

खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क / व्हॉट्सॲप करा :
९०९० ५०५० ६७ | ९६६४ २७८ ७१७

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *