आयआयटी मुंबई येथील ‘टेकफेस्ट’ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले मार्गदर्शन
मुंबई, दि. २२: देशाच्या प्रगती आणि विकासामध्ये आयआयटी व येथील विद्यार्थी, संशोधन यांचे बहुमुल्य योगदान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आयआयटी बॉम्बे येथे आयोजित टेकफेस्ट मध्ये सोमवारी २२ डिसेंबर रोजी केले.
सरकारमध्ये काम करत असताना येणाऱ्या तांत्रिक समस्यांवर त्वरित आयआयटी ला त्या समस्याबाबत अवगत केले जाते. त्यावर आयआयटी कडून सुचविले जाणारे उपाय हे सर्वांचा मान्य असतात एवढी विश्वसनीयता आयआयटी ची देशामध्ये आहे. आयआयटी ‘नॉलेज कॅपिटल’ असल्याचे गौरवोद्गार देखील त्यांनी काढले.
पुढे बोलताना ते म्हणाले, देशाच्या भविष्यामध्ये संसाधन तसेच भविष्याबाबतचे ज्ञान आणि तंत्रज्ञान महत्वाचे आहेत. कुठल्याही देशाच्या भविष्याबाबत जाणायचे असेल तर त्या देशाच्या वर्तमानात भविष्याच्या दृष्टीने होणारे संशोधन, नियोजन यावरून त्याचे मुल्यांकन होते. प्रधानमंत्र्यांनी फाइव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यात संशोधन आणि तंत्रज्ञानाचे मोठे योगदान आहे. ज्ञानाचे संपत्तीत रूपांतर करण्याची आज गरज असल्याचेही ते म्हणाले.
आज देशाला पर्यायी इंधन ची गरज आहे आणि यावर सरकाने काम केले. धानाच्या पराली पासून बायो बिटुमन तयार करून त्यापासून एक किमी चा रोड तयार करण्यात आले. पुढील लक्ष्य शेतीतील पिकं, कचरा यापासून हायड्रोजन निर्मितीचे आहे. हायड्रोजन वर वाहन चालविण्याच्या दिशेने काम सुरु आहे. नैसर्गिक संसाधनांवर आधारित उद्योग निर्माण करण्याची आज गरज असून यात देशाचे भविष्य म्हणून आयआयटी च्या विद्यार्थ्यांची भूमिका महत्वाची आहे, असे त्यांनी सांगितले. शिवाय यावेळी गडकरी यांनी विद्यार्थ्यांना नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे, नोकऱ्या निर्माण करणारे बना असे आवाहन देखील केले.

आयआयटी मुंबई चे चेअरमन प्रो. शिरीष केदारे, माजी चेअरमन डॉ. शरद सराफ, प्रो. सूर्यनारायण हुल्ला आदी यावेळी उपस्थित होते.
