“ही विधानसभा निवडणूक जनतेच्या भवितव्याचा निर्णय करणारी” – केंद्रीय नितीन गडकरी
तुळजापूर, दि. १४: सध्या राज्यातील सर्व पक्षीय नेते विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले पाहायला मिळत आहेत. यात भारतीय जनता पक्षाने आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांनाही प्रचारात उतरवले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हेही महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे आज ते प्रचारानिमित्त आले होते. यावेळी आपल्या भाषणात ते म्हणाले कि, “ही विधानसभा निवडणूक जनतेच्या भवितव्याचा निर्णय करणारी निवडणूक आहे.”
देशातली गरिबी, बेरोजगारी दूर व्हायला हवी, स्मार्ट शहरांप्रमाणेच स्मार्ट खेडी उभारली गेली पाहिजेत, देश पाच ट्रिलिनय अर्थव्यवस्था बनला पाहिजे तरच देश विश्वगुरू होईल, असं गडकरी म्हणाले. महायुतीच्या दहा वर्षात धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी सहा हजार कोटी रुपये निधी दिला, तुळजापूर तीर्थक्षेत्र म्हणून विकसित होत आहे, असं त्यांनी सांगितलं.
