Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

ओडीशात कहर बरसवल्यानंतर ‘फनी’ निघाले बंगालच्या दिशेने

ओडीशात कहर बरसवल्यानंतर ‘फनी’ निघाले बंगालच्या दिशेने

पुरी: फनी चक्रीवादळाने आज सकाळी ८च्या सुमारास ओडीशाच्या किनारपट्टीला धडक दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात कहर माजवला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बऱ्याच ठिकाणी झाडं निखळून पडली आहेत तर विजेचे खांबही कोसळले आहेत. तसेच बऱ्याच घरांच नुकसानही झालं आहे. हवामान खात्याच्या अनुसार जेव्हा वादळ ओडीशाच्या किनाऱ्याला धडकलं तेव्हा वाऱ्याची गती ही २०० किमी प्रतितास होती. त्याचवेळी चालू असलेल्या सततच्या पर्जन्यवृष्टीमुळे जन-जीवन विस्कळीत झालं आहे. जवळपास ११ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. आपत्ती व्यवस्थापनाची तुकडी चक्रीवादळशी लढण्यासाठी तयार आहे. व त्यांनी आपलं कामही सुरू केलं आहे. फनी चक्रीवादळामुळे रेल्वे, हवाई व रस्ते वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. आतापर्यंत १०० पेक्षा जास्त ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.

आता हे वादळ बंगालच्या दिशेने पुढे जात आहे. कोलकाता मध्येही पावसाला सुरुवात झाली आहे. कोलकाता रेल्वे अथॉरीटीने एक पत्रक काढून घोषित केले आहे की तिथे येणारी जाणारी विमानांची उड्डाण आज दुपारी ३ वाजल्यापासून उद्या शनिवारी सकाळी ८ पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. या वादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचाराच्या पुढच्या दोन दिवसांच्या सभा रद्द केल्या आहेत.

असं म्हटलं जातं की ‘फनी’ हे ओडीशाला धडकणारं गेल्या २० वर्षातलं सर्वात मोठं चक्रीवादळ आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *