Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘फनी’ ने धारण केले ‘गंभीर’ स्वरूप, चक्रीवादळ उद्या पुरीच्या किनाऱ्यावर देऊ शकते धडक

‘फनी’ ने धारण केले ‘गंभीर’ स्वरूप, चक्रीवादळ उद्या पुरीच्या किनाऱ्यावर देऊ शकते धडक

ओदिशा: आतापर्यंतचे सर्वात भयानक मानले जाणारे ‘फनी’ चक्रीवादळाने खूप गंभीर स्वरूप धारण केले आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्रप्रदेशात जोरदार पाऊस पडत आहे. ‘फनी’ उद्या ओदिशाच्या पुरी किनाऱ्याला धडक देऊ शकतं. या दरम्यान वाऱ्याची गती १७०-२०० किमी प्रतितास राहू शकते, असे हवामान खात्यातर्फे घोषित केले गेले आहे. या सर्व परिस्थितीमुळे एन.डी.आर.एफ., तटरक्षक दल, नौदल, वायुदल यांना हाय अलर्ट वर ठेवण्यात आलं आहे. किनारी भागत राहणाऱ्या ८ लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या सर्वांची व्यवस्था आपत्कालीन शिबिरांमध्ये करण्यात आली आहे.

स्थानिक प्रशासनाने शाळा, कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच निवडणूक आयोगानेही ११ जिल्ह्यांमध्ये आचारसंहिता शिथिल केली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत १०३ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज आपत्कालीन बैठक बोलवून परिस्थितीचा आढावा घेतला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *