Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

उमेदवार संतापला आणि चक्क मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनची केली तोडफोड

उमेदवार संतापला आणि चक्क मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनची केली तोडफोड

आंध्र प्रदेश: लोकसभा निवडणूकितील पहिल्या टप्प्याला आज सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर आंध्रप्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या मतदानालाही सुरुवात झाली आहे. देशाच्या विविध राज्यातील ९१ मतदारसंघात आज मतदान होत आहे. आंध्रप्रदेशातील अनंतपूरमध्ये जनसेना पार्टीच्या विधानसभा उमेदवारीने चक्क ईव्हीएम मशिनच जमिनीवर आदळली. या घटनेनंतर काही वेळ मतदान केंद्रावर गोंधळ उडाला. त्यानंतर, पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

अनंतपूर जिल्ह्यातील गुंटाकल मतदारसंघातील गुट्टी येथील मतदान केंद्रावर जनसेनेचे उमेदवार मधुसुदन गुप्ता आले. ईव्हीएमवर विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाचं नाव व्यवस्थित दिसत नसल्यानं त्यांनी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. गोंधळ झाल्याने काही वेळासाठी मतदान बंद झालं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मधुसूदन गुप्ता यांना अटक केली. यावेळी त्यांनी पोलिसांसोबतही गैरवर्तवणूक केल्याचा आरोप आहे.

आज आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या २५ जागांसह विधानसभेच्या १७५ जागांसाठी मतदान होत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *