Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात डिजिटल माध्यमं बजावणार महत्वाची भूमिका

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा,पंजाब आणि मणिपूर या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूका सात टप्प्यात होणार

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूका सात टप्प्यात होणार आहेत. या पाचही राज्यांमधे १० मार्चला मतमोजणी होईल. केंद्रिय निवडणूक आयोगाने आज निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारीला उत्तर प्रदेशात, दुसऱ्या टप्प्यात १४ फेब्रुवारीला उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि गोव्यात, तिसऱ्या टप्प्यात २० फेब्रुवारीला उत्तर प्रदेश, चौथ्या टप्प्यात २३ फेब्रुवारीला उत्तर प्रदेश, पाचव्या टप्प्यात २७ फेब्रुवारीला उत्तर प्रदेश आणि मणिपूर, सहाव्या टप्प्यात ३ मार्चला उत्तर प्रदेश आणि मणिपूर तर, सातव्या टप्प्यात ७ मार्चला उत्तरप्रदेशमध्ये मतदान होणार आहे.

राज्यनिहाय टप्प्यांचा विचार करता उत्तरप्रदेशात सात टप्प्यांमध्ये मणिपूरमध्ये दोन ट्प्प्यात पंजाब, गोवा, तर उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.  मतदानाचा कालावधी सर्व पाच राज्यांमध्ये एका तासाने वाढवण्यात आला आहे. उमेदवारांना  अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील उपलब्ध केली आहे. दरम्यान, विधानसभेसाठी उभ्या राहणाऱ्या उमेदवाराकरता, निवडणूक खर्चाच्या मर्यादेत वाढ केली आहे. मोठ्या राज्यांमध्ये ही वाढ ७० ते ९५ लाख रुपये आणि छोट्या राज्यांमध्ये ५४ ते ७५ लाख रुपये इतकी आहे.  संपर्क विरहित प्रचार व्हावा, यासाठी दूरदर्शनवर सर्व पक्षांना मिळणारा कालावधी दुप्पट करण्याचा विचार घेण्यात आला आहे. सर्वांनीच कोरोनाप्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करणं गरजेचं आहे.

राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी शक्य तितका अधिक प्रचार डिजिटल आणि ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा सल्ला दिला आहे. शक्यतो थेट प्रचार टाळावा. लोकांना प्रत्यक्ष भेटून प्रचार करताना उमेदवारासह जास्तीत जास्त पाचच जणांना परवानगी दिली आहे. कोणत्याही प्रकारचे रोड शो, पदयात्रा बाईक रॅली आदींना १५ जानेवारीपर्यंत मनाई केली आहे. रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत प्रचारावर बंदी आहे. निकालानंतर मिरवणूक काढता येणार नाही.

Source-AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *