देशभरात ईद चा उत्साह, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिल्या ईदच्या शुभेच्छा
देशभर काल ईदचा चा चंद्र दिसल्यानंतर आज ईद-उल-फित्र उत्साहात साजरी केली जात आहे. ईद च्या निमित्ताने मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि देशात व जगात शांती प्रस्थापित राहावी म्हणून प्रार्थना केली. ईद चा चंद्र दिसल्यानंतर एक महिन्यापासून चालू असलेला रमजानचा पवित्र महिना आज संपला.
# सिलिगुडी येथे भारत-बांग्लादेश बॉर्डर जवळ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि बॉर्डर गार्डस बांग्लादेश च्या जवानांनी ईद च्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा व मिठाई दिली.
# गुजरात च्या वडोदरा येथे क्रिकेटर युसूफ पठाण ने तैफ नगर मस्जिद मध्ये नमाज पठण केली.
# ईद निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या
Have a blessed Id-ul-Fitr. pic.twitter.com/71R9GMW3Tf
— Narendra Modi (@narendramodi) June 5, 2019
#काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ईद च्या सर्वांना शुभेच्छा दिल्या
#EidMubarak and my best wishes to all on the auspicious occasion of #EidulFitr pic.twitter.com/0lBpD1SL3O
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 5, 2019
