भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा एकदा हादरला डहाणू-तलासरी परिसर, घर कोसळून झाली जीवितहानी
डहाणू: पालघर-डहाणू परिसरात गेले काही महिने चालू असलेले भूकंपाचे सत्र अद्याप थांबायचे नाव घेत नाहीये. किंबहुना त्याची दाहकता आता हळू हळू वाढू लागली आहे.
काल बुधवार दिनांक २५ जुलै रोजी मध्यरात्री डहाणू-तलासरी परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या धक्क्याने नागझरी बोंडपाडा येथे एक कौलारू आणि माती कुडाच्या भिंती असलेले घर कोसळले. या दुर्घटनेत रिश्या दामा मेघवाले (५५) यांचे प्राण गेले तर त्यांच्या पत्नी या किरकोळ जखमी झाल्या आहेत. काल मध्यरात्री झालेल्या दोन भूकंपांची तीव्रता रिष्टर स्केल वर अनुक्रमे ४.८ व ३.६ मोजण्यात आली. भारतीय हवामान खात्याने या बाबतचे तपशील दिले आहेत. हवामान विभागाने नोंद केल्यानुसार गेल्या नोव्हेंबर पासून आतापर्यंत ३५ भूकंपाच्या धक्यांची नोंद करण्यात आली आहे.
सध्या भारतीय भूविज्ञान संशोधन संस्था डहाणू परिसरात सततच्या होणाऱ्या भूकंपांची कारणे अभ्यासात आहे
