Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

आरोग्य: शेवग्याची पाने, फुले व शेंगा खाल्ल्यामुळे शरीराला ‘हे’ व्हिटॅमिन्स मिळतात

आरोग्य: शेवग्याची पाने, फुले व शेंगा खाल्ल्यामुळे शरीराला ‘हे’ व्हिटॅमिन्स मिळतात


आयुर्वेद कुतुहल भाग ४६
शेवगा (शेगट)
शेवग्या बद्दल आज लिहिण्याचे कारण म्हणजे कृष्ण जन्माष्टमी आणि शरद ऋतूची सुरवात, कोकणात ह्या दिवसाला शेवग्याच्या पानांची भाजी देवाला नैवद्य म्हणून दाखवतात. आयुर्वेदात शेवग्याला शिग्रु असे म्हणतात त्याचा आहार आणि औषधी असा दुहेरी उपयोग होतो.
शेवग्याची कोवळी पाने, फुल, शेंगा ह्यांचा आहारात उपयोग होतो. शेंगांमध्ये कॅल्शिअम चे प्रमाण अधिक असते म्हणूनच आहारातील कॅल्शिअम स्रोत म्हणून ह्याचा वापर आहारात नक्की करावा, त्याच प्रमाणे त्याच्या पानांमध्ये हि व्हिटामिन ए, बी,सी आणि कॅल्शिअम असते आधुनिक शास्त्राच्या ह्या महितीमुळे शेवग्याची पाने, फुले, शेंगा ह्यांचे आहारातील महत्व आपणास कळते.
आयुर्वेदानुसार शेवगा तिक्त मधुर रसाचा, तिखट विपाकाचा आणि उष्ण विर्याचा आहे, त्यामुळेच तो वाताला कमी करण्याचे काम करतो. ह्याच्या सेवनाने पोटातील पित्त कार्यान्वित होऊन अन्नाचे योग्य पचन होते आणि मल उत्पत्ती थोडी अधिक होते, म्हणूनच अग्निमांद्य,बद्धध कोष्टता ह्यांवर शेवग्याचा पाला नक्कीच फायदा करतो. ह्या काळात शरद आणि वर्षा ऋतूची ऋतुसंधी असते आणि अग्निमांद्य असल्याने पचनाचे विकार उद्भवू शकतात अशा वेळी शेवग्याचा आहारातील समावेश योग्य ठरतो.
शेवग्याच्या बियांपासून मिळणारे तेल संधिवातात वापरतात तसेच त्याच्या झाडाच्या सालीची वाफ दुखत असलेल्या जागी दिली तर दुखणे थांबते. अशा प्रकारे त्याचे अनेक उपयोग आहेत. परंतु, आजाराचे मूळ कारण पचन संस्था त्याचे नियमन करण्याचे कार्य ह्या शेवग्या कडून होते तेव्हा ह्याचा आहारात समावेश अवश्य करावा.

भेटूया पुढल्या लेखात नवीन विषय घेऊन तोपर्यंत
आयुष्य जगा आयुर्वेदा संगे ।।

लेख आवडला असल्यास   शेअर करा  ।   LIKE  करा  ।  कंमेंट करा  

वैद्य शार्दुल चव्हाण
एम. डी. आयुर्वेद
9987925720
जगदंब The Ayurvedic World ,
Ayurvedic Clinic and Panchkarma Center

फोटो सौजन्य :

(Disclaimer: सदर लेखातील मते हि लेखक/लेखिकेची स्वतःची मते आहेत. न्युज पोर्टल फक्त एक माध्यम आहे.)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *