एका भारतीय नागरिकाला केली अटक
मुंबई, दि. ०१: सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका महत्त्वपूर्ण कारवाईत, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय (सीएसएमआय) विमानतळावर १ जून २०२५ रोजी विविध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत सूचीबद्ध केलेल्या जिवंत आणि मृत वन्यजीव प्रजातीचे प्राणी जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणासंदर्भात एका भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे.
विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ३१ मे २०२५ रोजी फ्लाइट क्रमांक टीजी ३१७ ने मुंबईत आलेल्या एका प्रवाशाला रोखले. तपासणी दरम्यान प्रवाशाच्या वर्तनात तो चिंताग्रस्त असल्याचे दिसून आले. या प्रवाशाच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. तपासणीत खालील गोष्टी जप्त करण्यात आल्या:
१. स्पायडर टेल्ड हॉर्न्ड वाइपर (स्यूडोसेरास्टेस उराराच्नॉइड्स): ३ जिवंत साप, जे CITES च्या परिशिष्ट-II आणि नव्याने सुधारित वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या अनुसूची IV अंतर्गत सूचीबद्ध आहेत.
२. एशियन लिफ टर्टल (सायक्लेमिस डेन्टाटा): ५ जिवंत कासवे , जे CITES च्या परिशिष्ट-II आणि नव्याने सुधारित वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या अनुसूची IV अंतर्गत सूचीबद्ध आहेत.
३. इंडोनेशियन पिट वाइपर (ट्रायमेरेसुरस इन्सुलारिस): ४४ साप (४३ जिवंत आणि १ मृत), जे सध्या CITES अंतर्गत सूचीबद्ध नाहीत. त्यानंतर प्रवाशाला सीमाशुल्क कायदा, १९६२ च्या तरतुदींनुसार अटक करण्यात आली. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे.



**
