काय त्या भाजप मुंबई अध्यक्षाची दैना… शिवसेनेने राबवले, मुख्यमंत्र्यांनी फसवले – धनंजय मुंडे
मुंबई: निवडणुकीच्या रिंगणात राजकीय पक्षांमध्ये एकमेकांची खिल्ली उडवण्याची अतितटीची स्पर्धा सुरू आहे. त्यात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपचे मुंबईतील नेते आशिष शेलार यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हंटले आहे की, काय त्या भाजप मुंबई अध्यक्षाची दैना… मंत्रिपद दिलं जायना…शिवसेने विरोधात राबराब राबवले, पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसवले. प्रत्येक बाबतीत मुख्यमंत्र्यांनी यांना फसवले, आता यांना यांच्यातलेच कवी ‘आठवले.’
या टीकेवर आशिष शेलार कशाप्रकारे उत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
काय त्या भाजप मुंबई अध्यक्षाची दैना
मंत्रिपद दिलं जायना
शिवसेनेविरोधात राबराब राबवले
पुन्हा त्यांच्या मांडीला मांडी लावून बसवले
प्रत्येक बाबतीत मुख्यमंत्र्यांनी यांना फसवले
आता यांना यांच्यातलेच कवी 'आठवले'@ShelarAshish @BJP4Maharashtra pic.twitter.com/nT4peJtaU8— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 28, 2019
