Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

मलायका अरोरा-अर्जुन कपूर लवकरच अडकणार विवाहबंधनात…

मलायका अरोरा-अर्जुन कपूर लवकरच अडकणार विवाहबंधनात…

बॉलिवूडमधील प्रसिद्ध डान्सर मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर हेे दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.

१९ एप्रिलच्या मुहूर्तावर मलायका-अर्जुन लगीनगाठ बांधणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ख्रिश्चन पद्धतीने मलायका-अर्जुन विवाहाच्या आणाभाका घेणार असल्याचं म्हटलं जातं.

मलायका आणि अर्जुन यांच्या अफेअरची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये रंगली आहे. सगळ्या चर्चांना स्वल्पविराम देत अखेर या दोघांनी लग्न करायचे ठरवले.

मलायका आणि अर्जुन यांच्या वयामध्ये तब्बल बारा वर्षांचं अंतर आहे. मलायका अर्जुनपेक्षा बारा वर्षांनी मोठी आहे. ती ४५ वर्षांची आहे, तर अर्जुन अवघ्या ३३ वर्षांचा आहे. त्यामुळे दोघांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला.

मलायका आणि अभिनेता अरबाज खान यांचा २०१७ मध्ये घटस्फोट झाला होता. १८ वर्षांच्या सुखी संसारानंतर ते विभक्त झाले होते. त्यांना अरहान हा १६ वर्षांचा मुलगा देखील आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *