Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

‘ह्या’ राजकीय व्यक्तीवरही बनणार बायोपिक, ‘ही’ अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

‘ह्या’ राजकीय व्यक्तीवरही बनणार बायोपिक, ‘ही’ अभिनेत्री साकारणार मुख्य भूमिका

राजकारण व हिंदी चित्रपटसृष्टी यांचं एक घट्ट अस समीकरणच तयार झालं आहे. विविध राजकीय नेत्यांच्या जीवनावरील बायोपिक रुपेरी पडद्यावर येण्यास सुरुवात झाली आहे. आता बॉलीवूडमध्ये लकरच आणखीन एका राजकीय नेत्यावर आधारित बायोपिक येण्याची तयारी सुरू झाली आहे.

बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांच्यावर आधारित बायोपिक येणार आहे. सुभाष कपूर सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. मायावतींच्या भूमिकेसाठी दिग्गज अभिनेत्रींचे ऑडिशन्स घेण्यात आले होते. त्यानुसार जवळपास ७ ते ८ अभिनेत्रींची नावं शॉर्ट लिस्ट करण्यात आली. त्यापैकी विद्या बालनच्या नावावर मायावती यांच्या भूमिकेसाठी शिक्कामोर्तब करण्यात आले.

विद्या बालनने ‘डर्टी पिक्चर’ या सिनेमात सिल्क स्मिता यांच्या बायोपिकवर काम केले होते. सुपरस्टार एन.टी. रामाराव अर्थात एनटीआर यांच्या जीवनावरील बायोपिकमध्ये विद्या बालनने एनटीआर यांची पहिली पत्नी बसवातारकम यांची भूमिका साकारली होती.

लवकरच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवनावरही सिनेमा येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *