“तुमच्या काळात पैसा दिसायचाच नाही कारण तो तुमच्या दलालांच्या थेट खिशात जायचा”, देवेंद्र फडणवीस यांची शरद पवारांवर टीका
यवतमाळ: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत यंदा राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात कलगीतुरा रंगलेला पहायला मिळतोय. पैलवान, कुस्तीचा आखाडा या नाट्या नंतर आता पुढच्या अध्यायात कडवट टिकांची सुरवात झाली आहे.
आज विदर्भातील यवतमाळ येथील सभेत देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर शेतकरी कर्जमाफीच्या आकड्यावरून त्यांच्या टीकेला उत्तर देताना सांगितले की, “तुमच्या काळात पैसा दिसायचाच नाही कारण तो तुमच्या दलालांच्या थेट खिशात जायचा. आमच्या काळात दलालच नाहीत, मुंबई किंवा दिल्लीहून पैसा निघाला की थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो.” ५३,००० कोटींचा पूर्ण हिशोब आम्ही दिल्याचेही ते पुढे म्हणाले.
